- निवृत्त कर्नल दीपक कुमार गुरुंग यांचे आवाहन
- गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेतर्फे आजादी-का-अमृत महोत्सव'कार्यक्रम
बेळगाव /प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी शालेय जीवनापासूनच कठोर परिश्रम घेतात. पण अनेकदा ध्येय निश्चित नसल्याने अपयश येते. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा असे आवाहन भारतीय सैन्य दलात 35 वर्षे सेवा बजावणारे दिल्ली, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या एनसीसी बटालियन चे वरिष्ठ अधिकारी निवृत्त कर्नल दीपक गुरुंग यांनी केले. शहरातील गजाननराव भातकांडे शाळेतर्फे नुकताच शाळेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांच्या अध्यक्षतेखाली 'आजादी- का -अमृत महोत्सव' हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूकर उपस्थित होत्या. प्रारंभी मिलिंद भातखंडे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवृत्त कर्नल दिपक गुरुंग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्याध्यापिका खन्नूकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पुढे बोलताना निवृत्त कर्नल दीपक गुरुंग यांनी स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रध्वजाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांना समायोजित मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी नूपुर संताजी व भूमी शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments