अथणी येथील घटना : 10 हून अधिक विद्यार्थी जखमी
टेम्पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 10 हून विद्यार्थी जखमी झाले असून कॉलेज बस आणि टेम्पो चालक दोघेही ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी अथणी येथे घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अथणी मिरज रोडवर तीन किलोमीटर अंतरावर बनजवाड येथे हायस्कूल आणि कॉलेज आहे. शनिवारी सकाळी 7 वा. 30 मि. सुमारास अथणी हून विद्यार्थ्यांना घेऊन बस कॉलेजकडे निघाली होती, दरम्यान पाईपची वाहतूक करणारा आयशर टेम्पो मिरजहून अथणी कडे होता. अथणी शहरानजीक टेम्पो आणि कॉलेज बसची समोरा समोर धडक बसून हा अपघात घडला.
या अपघातात बस मधील एका शिक्षकाचा हात आणि पाय तुटला आहे. तर बसमधील चालकाच्या बाजूने बसलेले काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर आमदार श्रीमंत पाटील यांनी घटनास्थळी स्वतः फाउंडेशन च्या माध्यमातून रुग्णवाहिका पाठविली आणि जखमींना अधिक उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात पाठविले.
अपघाताची माहिती मिळताच अथणी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताबाबत चौकशी सुरू आहे.
0 Comments