बेळगाव / प्रतिनिधी 

नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचे अपहरण एका मुस्लिम तरुणाने केल्याचा गंभीर आरोप संबंधित तरुणीच्या कुटुंबियांनी केला असल्याचे समजते. सदर तरुणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात ही घटना घडली आहे. १७ दिवसांपूर्वी सदरुद्दीनने एका हिंदू मुलीचे अपहरण केले होते. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या घरावर दगडफेक करून आपला राग काढला. पोलिसांनी गुन्हा

दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे सदरुद्दीन बेपारी नावाचा तरुण आणि नर्सिंगचे शिक्षण घेणारी तरुणी यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन दोन-तीन वर्षे झाली. दरम्यान घरच्यांनी याला विरोध केल्याने दोघेही घरातून फरार झाले आहेत का असा संशय व्यक्त होत आहे.