विजयपूर  / दीपक शिंत्रे 

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून कर्नाटक गृह मंडळाचे एफ.डी.ए. शिवानंद केंभावी यांच्या घर आणि फार्म हाऊसवर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अंदाजे २ कोटी ३४ लाख रुपये मूल्याच्या अवैध मालमत्तेची माहिती मिळाली.

याबाबत लोकायुक्तांच्या एसपी टी. मल्लेश यांनी दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे की, कर्नाटक गृह मंडळाचे एफ.डी.ए. शिवानंद केंभावी यांचा विजयपूर शहरातील सुकून कॉलनीतील घर आणि विजयपूर तालुक्यातील तिडगुंदी गावाजवळील फार्म हाऊसवर लोकायुक्तांनी छापा टाकला. दस्तऐवजांची तपासणी करत असताना अंदाजे १५ लाख रुपयांच्या रोख रकम, सोनं-चांदीचे दागिने, वाहने आणि इतर मालमत्तेच्या संबंधित दस्तऐवज सापडले. यावरून अंदाजे २ कोटी ३४ लाख रुपये मूल्याच्या अवैध मालमत्तेचा शोध लागला, असे  नमूद करण्यात आले आहे.

लोकायुक्त एसपी डॉ. मल्लेश यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, यामध्ये डीवायएसपी सुरेश रेड्डी, सीपीआय आनंद तकन्नवर, आनंद डोणी आणि लोकायुक्त पोलिस स्टेशनचे कर्मचारी सहभागी होते.