बेळगाव / प्रतिनिधी
प्रसूतीसाठी बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कीर्ती नेसरगी (वय १९ रा. लगमेश्वर, ता. गोकाक) असे त्या दुर्दैवी बाळंतिणीचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी बीम्स हॉस्पिटल मधील प्रसुती विभागात तिच्यावर सिझेरियन करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर अति रक्तस्त्रावाने तिची प्रकृती खालावली. रक्तस्त्राव होत असूनही तिला आयसीयूमध्ये न हलवता सामान्य वॉर्डमध्ये तिच्यावर उपचार करण्यात येत होते. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कीर्तीचा मृत्यू झाला आहे.
0 Comments