सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव तालुक्याच्या सुळगा (हिं.) गावात मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री ब्रह्मलिंग मंदिर (कल्याण मंटप) येथे आरोग्य चिकित्सा (ताप, सर्दी, डोकेदुखी अंगदुखी,ॲसेडिटी) आणि नेत्र परीक्षण चष्मा व औषध वाटप शिबीर होणार आहे. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालय रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव, श्री शिवशक्ती युवक मंडळ, छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज युवक मंडळ, श्री शाहू युवक मंडळ, श्री हळदी युवक मंडळ, श्री देवस्की पंच कमिटी आणि आजी - माजी पदाधिकारी, भजनी मंडळ, पंचमंडळी, युवक मंडळ व महिला मंडळ, सुळगा, हिंडलगा, (बेळगाव) यांच्यावतीने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी रु. १०/- नोंदणी फी आकारली जाणार आहे. तरी गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.