बैलहोंगल : तालुक्यातील अरवळ्ळी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने केएसआरटीसी परिवहनची बस पलटी झाली. बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज सोमवारी ही घटना घडली.
परिवहन मंडळाची बस एनगी गावातून बैलहोंगल लिंगदळ्ळी मार्गे जात असताना अरवळ्ळीजवळ उलटली. बसमधील सुमारे १० ते १५ जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अरवळ्ळ्ळी ग्रामस्थ व १०८ रुग्णवाहिकेच्या सहकार्याने बैलहोंगल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0 Comments