बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला विशेष अथिती म्हणून आमंत्रित करण्यात होते. यानिमित्ताने डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, शंभर बाल कर्करोग रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र आले.
यांच्यासमवेत वेळ घालवणे खरोखरच एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव होता. वैद्यकीय पथकाबद्दल मुले आणि त्यांच्या पालकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता मनापासून हृदयस्पर्शी होती.रुग्णांना दररोज अढळ पाठिंबा, प्रोत्साहन आणि त्यांचामध्ये जगण्याची आशा निर्माण करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
यावेळी श्रीमती.सुनीता देसाई यांनी शंभरहून अधिक पुस्तके दान केली. ज्यामुळे या तरुण मनांना आनंद आणि शिक्षण मिळाले. तर रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने काही क्रीडा साहित्य आणि इतर प्रकारची मदत केली.
या कार्यक्रमाला डॉ. रोहन भिसे, डॉ. कुमार विंचूरकर, डॉ. तन्मय मेटगुड, डॉ. अभिलाषा एस., डॉ. ज्ञानेश डी. के., डॉ. इम्तियाज अहमद, डॉ. शैलेश खडबडी, डॉ. विराजे, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा आरटीएन रुपाली जनाज, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरटीएन. सुजाता वस्त्रद, आरटीएन. राजश्री उप्पीन, आरटीएन. सरिता पाटील, आरटीएन. पुष्पा पर्वतराव, सौ.सुनीता देसाई, सौ.आशा पत्रावळी उपस्थित होत्या.
0 Comments