बेळगाव / प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे वार्षिक नाट्यप्रयोग आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती वीणा लोकूर यांनी दिली.
शुक्रवारी बेळगावात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत वीणा लोकूर पुढे म्हणाल्या, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे एक नवा प्रयोग केला जात आहे. दर्जेदार, पुरस्कारप्राप्त, प्रायोगिक रंगभूमीवरील नाटके बेळगावात रंगणार आहेत. दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता टिळकवाडी येथील वरेरकर नाट्यसंघात सदर नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments