बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेच्या महापौर - उपमहापौरांचा कार्यकाळ संपला असून लवकरच निवडणूक घेण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी आमदार अभय पाटील यांनी नगरसेवकांसह प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
बेळगावच्या महापौरपदाचा कार्यकाळ संपला असतानाही निवडणूक होऊ नये यासाठी काँग्रेस सरकारने प्रादेशिक आयुक्तांवर दबाव आणला आहे. महापौर निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी विनंती प्रादेशिक आयुक्तांना करण्यात आली आहे. यापूर्वी दोन नगरसेवकांना अपात्र ठरवल्या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला सुरू असून त्या नगरसेवकांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.
राज्यपालांनी सरकारला पत्र लिहिले असून सरकारने उत्तर दिल्यानंतर कारवाई केली जाईल. नगरसेवक होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिलावात दुकान खरेदी करूनही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments