• शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील अल्लेहोळ गावात बिबट्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक शेतकरी परशराम पाटील यांना शनिवारी शेतातून परतत असताना हा बिबट्या दिसला. त्यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केला.  

शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी ये - जा करावी लागते. मात्र हेस्कॉम विभागाकडून या भागात अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. अशात या बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यालगत रहिवासी भाग असून बिबट्याने हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. 

तरी वनविभाग व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असून, अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांचा धोका टाळण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.