बागलकोट / वार्ताहर 

कर्जाची वसुली क्रूरपणे करू नये यासाठी सरकारने मायक्रो फायनान्सर्सना कितीही निर्देश दिले असले तरी छळवणुकीच्या घटना कमी होत नाहीत. बागलकोट जिल्ह्यातील रबकवी बनहट्टी तालुक्यातील बंडीगनी गावातील राजेश्वरी मदार (वय ५१) या महिलेने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २९ जानेवारी रोजी घडलेली घटना उशिरा उघडकीस आली आहे.

राजेश्वरी स्पंदना मायक्रोफायनान्सकडून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दोन महिने हप्ता भरले नव्हते. मायक्रोफायनान्सचे कर्मचारी सोनू बागलकोटे आणि अन्य कर्मचारी राजेश्वरीच्या घरात घुसले. यावेळी राजेश्वरीने आंघोळीसाठी गेल्या होत्या. तिला गावच्या कालव्यापर्यंत ओढत नेले. म्हातारी झाली तरी तुला अक्कल नाही. तू मेलास तर बरे होईल. तुझ्या विम्याच्या पैशाने कर्ज फेडू शिवीगाळ केल्याचा आरोप राजेश्वरी यांनी केला आहे.

गोळी खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या राजेश्वरीवर जमखंडी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेश्वरीचा मुलगा अशोक मदाराच्या तक्रारीवरून बनहट्टी पोलिस ठाण्यात सोनू आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.