बेळगाव : येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सहकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक उपनयन सोहळा आता सोमवार 7 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. चिदंबरनगर येथील चिदंबरेश्वर देवस्थानात होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी श्री. अरुण कुलकर्णी 9448814718 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.