खानापूर / प्रतिनिधी 

दोड्डहोसुर येथील रहिवासी व खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक शिवाजी पाटील कार अपघातात जखमी झाले आहेत.

काल शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वा. सुमारास, त्यांच्या गावापासून काही अंतरावर असलेल्या यडोगा कत्री येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. 

सध्या शिवाजी पाटील यांच्यावर बेळगाव येथील विजय हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी शनिवारी रात्री रुग्णाल्यास भेट देऊन जखमींची विचारपूस आणि डॉक्टरांशी चर्चा केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त  माहिती अशी की, शिवाजी पाटील यांची मुलगी बेंगळूरू येथून बेळगावला आली होती. तिला घेऊन आपल्या दोड्डहोसुर गावी येत असताना, खानापूर - पारिशवाड मार्गावरील यडोगा क्रॉसजवळ  त्यांच्या कारचा टायर फुटला आणि  नियंत्रण सुटून कार झाडाला धडकली व कारने दोनवेळा पलटी झाली.  त्याचवेळी त्यांच्या गावातील युवक सन्नहोसूर-भंडरगाळी येथील लक्ष्मी यात्रेसाठी जात होते. त्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली व ताबडतोब आपल्या दुचाकी थांबवून संचालक शिवाजी पाटील व त्यांच्या मुलीला कार मधून बाहेर काढले आणि पोलिसांना याची माहिती दिली. तसेच उपचारासाठी बेळगाव येथील विजया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी स्कॅनिंग केले असून, उपचार सुरू ठेवले आहेत. शिवाजी पाटील यांच्या मानेला व डोळ्याच्या खाली असलेले हाड फ्रॅक्चर झाले असल्याचे सांगितले आहे. तसेच काळजी करण्यासारखे काही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु शिवाजी पाटील थोडे बेशुद्धावस्थेत आहेत. तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर सुद्धा विजया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.