बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव ताशिलदार गल्ली येथील जननी महिला मंडळाच्यावतीने मकर संक्रांती निमित्त तिळगुळ समारंभ व हळदीकुंकू मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महिला मंडळाच्या सभासद भगिनी तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मंडळाच्या वतीने महिलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित करण्यात आले होते या खेळांमध्ये तहसीलदार गल्ली व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. महिलांसाठी आयोजित खेळांमध्ये विजयी झालेल्या महिलांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तर उपस्थित महिलांना हळदीकुंकू आणि वाण देण्यात आले. यावेळी जननी महिला मंडळाच्या भारती जुवेकर, रेश्मा बाद्रे, स्वाती चौगुले, गीता जुवेकर, वैशाली चौगुले, मेघा जाधव, सुनिता बेडरे, गायत्री पाटील, लक्ष्मी मस्तहोळीमठ, अनिता गेंजी व शिला चौगुले यांच्यासह मंडळाच्या सभासद भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.