बेळगाव : मुजावर गल्ली येथील पंच आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी नगरसेवक सुरेश गणपतराव खन्नूकर (वय ८८) यांचे शुक्रवारी सकाळी १०.३० वा. सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. जुन्या काळातील नामवंत हॉकीपटू असणारे सुरेश खन्नूकर हे मोहन बागान हॉकी क्लबचे माजी खेळाडू होते. रक्षाविसर्जन सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे होणार आहे.
0 Comments