बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव रहदारी पोलिसांकडून आज सोमवारी सकाळी शहरातील विविध रस्त्यांवर दुचाकी चालवताना सक्तीने हेल्मेट परिधान करण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

वाढत्या दुचाकी अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकी वरील हेल्मेट वापराला प्रोत्साहन देऊन अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव शहर रहदारी पोलिसांनीकडून आज सकाळी हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली. केएसआरपी प्रशिक्षण केंद्र कंग्राळी, बेळगाव उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालय वगैरे विविध मार्गांवर सदर हेल्मेट जनजागृती मोहीम राबविण्यात आली. एकीकडे हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करत असणाऱ्या रहदारी पोलिसांनी दुसरीकडे विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना आगळी शिक्षा दिली. संबंधित दुचाकी स्वारांच्या हातात जनजागृतीचे फलक देऊन त्यांना भर रस्त्यात उभे करण्यात आले होते.