बेळगाव / प्रतिनिधी
राज्य मराठी विकास संस्था, मराठी विद्यानिकेतन व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले व स्त्री जीवन या विषयावर आधारित पालक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाला सर्वांचाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जवळपास २२ नवोदित कवींनी या कवी संमेलनात सहभाग घेतला व सावित्रीबाई फुले यांचे कार्य त्याचबरोबर स्त्री जीवन या विषयावर उत्तमोत्तम कविता सादर केल्या.
प्रथमता वि. गो. साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी स्वागत केले. सचिव सुभाष ओऊळकर यांनी कवी संमेलनाचा हेतू स्पष्ट केला. आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख व्हावी व त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. कवी संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आले. यानंतर पालकांच्या मधून जिजा ओऊळकर, सोनाली बिर्जे, वर्षा पाटील, आदिती शिंदे, सुवर्णा पाटील व केदारी गुंजीकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. मुलांच्या मधून वृंदा भांदूर्गे, अभय पाटील, अनुष्का पाटील, अर्णव जाधव, मनाली बराटे, श्रेया घोळसे या विद्यार्थ्यांनी आपली कविता सादर केली. व शिक्षकांच्या मधून गजानन सावंत, बी. जी. पाटील, बी. एम. पाटील, मंजुषा पाटील माया पाटील, शाहीन शेख, शैला पाटील, कमल हलगेकर, सहदेव कांबळे व प्रसाद सावंत यांनी आपल्या कविता सादर केल्या. सर्व कवींना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रा. ज्योती मजूरकर, प्रा. अशोक अलगोंडी, चंद्रशेखर गायकवाड, प्रतापसिंह चव्हाण तसेच पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्री. बी. बी. शिंदे यांनी केले. प्रास्ताविक इंद्रजीत मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन हर्षदा सुंठणकर यांनी व्यक्त केले.
0 Comments