येळ्ळूर ता. १६ : सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे आज रोटरी क्लब बेलगाम साऊथ कडून स्वच्छतागृहांचे भूमिपूजन करण्यात आले. शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि त्यांना असणाऱ्या स्वच्छतागृहांची कमतरता हे पाहता विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाची अत्यंत आवश्यकता आहे. हे ओळखून रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्याकडून स्वच्छतागृहांसाठी साडेचार लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात येणार आहे.
याचे नुकतेच भूमिपूजन रोटरी क्लब ऑफ बेलगाम साउथचे प्रेसिडेंट आरटीएन श्री. निलेश पाटील यांच्या हस्ते झाले. या भूमिपूजनाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ बेलगामचे सेक्रेटरी भूषण मोहिरे, असिस्टंट गव्हर्नर आरटीएन अनंत नाडगौडा, पीडीजी आरटीएन श्री. आनंद कुलकर्णी आणि आरटीएन श्री. व्यंकटेश देशपांडे, आयु फाउंडेशनचे चेअरमन आरटीएन श्री. मनोज सुतार, कॉलिटी फीड प्रायव्हेट लिमिटेडचे हेड अकाउंटंट आरटीएन श्री. विनायक सुभेदार, त्याचबरोबर येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य श्री. सतीश बाळकृष्ण पाटील, शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षा श्रीमती रूपा श्रीधर धामणेकर, उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर ,सदस्य श्री. मूर्तीकुमार माने, श्री. जोतिबा पाटील, श्री. मारुती यळगुळकर, श्री. चांगदेव शिवाजी मुरकुटे, श्री. शशिकांत पाटील, श्रीमती अल्का कुंडेकर, श्रीमती दिव्या कुंडेकर, श्रीमती प्रियांका सांबरेकर, श्रीमती राजश्री सुतार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. चलवादी, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. सतीश पाटील, व्यंकटेश देशपांडे, निलेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती. मेघा देसाई यांनी सूत्रसंचालन व श्री. एस्. बी. पाखरे यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments