येळ्ळूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) येथील सभागृहात मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी सावित्रीबाई फुलेच्या फोटोंचे पूजन श्री एस.एस.केंगेरी सर यांनी केले.तदनंतर सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी.सेजल मधुकर थोरवत, विनंती विट्ठल पाटील आणि प्रिया श्रीकांत पाटील यांची भाषणे झाली.

समाज विज्ञान विषयतज्ञ शिक्षक श्री. एम.पी.कंग्राळकर सर यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेतला.तदनंतर श्री.एस.एस.केंगेरी यांनी अध्यक्षीय भाषण केले.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शाळेच्या शिक्षिका श्रीमती. रेखा कंग्राळकर मॅडम आणि सौ.सुजाता वंडेकर मॅडम यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला श्री. जे.जे.पाटील सर, श्री. एम. एस.वाडकर सर,श्री. एन. एस.कुकडोलकर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेखा कंग्राळकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सुजाता वंडेकर मॅडम यांनी केले.