- अपघातात दोघे गंभीर
खानापूर / प्रतिनिधी
कारची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. खानापूर - अनमोड मार्गावरील नेरसे क्रॉसजवळ शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी ही घटना घडली. या अपघातात लकमान्ना सन्नाप्पा हणबर (वय ६५ रा. मुडगई) आणि मल्लव्वा महेश गावडे (वय ४५ रा. जगलबेट,ता. जोयडा) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खानापूर येथील सरकारी रुग्णालयांत प्रथमोपचार करून, अधिक उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, जखमी लकमान्ना आणि मल्लवा हे अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळी नेरसे क्रॉसजवळ पाठीमागून आलेल्या (एमएच ०२ जीपी ८४७७) या क्रमांकाच्या कारने, दुचाकीला पाठीमागून ठोकर दिली. यात दुचाकीसह लकमांन्ना आणि मल्लवा रस्त्याच्या बाजुला असलेल्या चरीत पडले. त्यामुळे त्यांना जबर मार बसला आहे. लकमान्ना यांच्या पायाला तर मल्लव्वा यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला आहे. त्यामुळे त्यांना पुढील अधिक उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे
0 Comments