बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभेच्या खासदार प्रियांका गांधी यांनी कार अपघातात जखमी झालेल्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त मंगळवारी बेळगावात आलेल्या खासदार प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी मृणाल हेब्बाळकर गेले, असता त्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषिमंत्री एन. चालुक्यराय स्वामी, विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी विजया हॉस्पिटलला भेट देऊन उपचार घेत असलेल्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना हुबळीच्या सिद्धरुध मठाचा प्रसाद दिला आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री शरण प्रकाश पाटील, शृंगेरीचे आमदार टी.डी. राजेगौडा, विधान परिषद सदस्या उमाश्री, खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर, मूडीगेरीच्या आमदार नयना मोतम्मा, मंत्री शिवानंद पाटील, एच.के.पाटील, रहीम खान, शरणप्रकाश पाटील, माजी आमदार उमाश्री, परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, मंत्री चालुवरायस्वामी, महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी, मंत्री ईश्वरा खांद्रे, आमदार अनिल चिक्कमडू, विनय गुरुजी यांनी विजया हॉस्पिटलला भेट देऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
0 Comments