- टोकन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ
तिरुमाला : आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरातील वैकुंठाद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत चार भाविकांचा मृत्यू झाला. सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठाद्वार दर्शन टोकनसाठी रांगेत उभे होते. बैरागी पट्टीडा पार्क येथे भाविकांची रांग लावण्यात आली असताना ही घटना घडली.
वैकुंठद्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले असल्यामुळे टोकनसाठी हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या घटनेत अन्य चार भाविक गंभीर आहेत. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी भाविकांवर नियंत्रण मिळवले ते सांगण्यात आले.
0 Comments