- अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पणाच्या वर्धापन दिनानिमित्त पारायण सोहळा
उचगांव / वार्ताहर
अयोध्या येथे नवीन बांधलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या बुधवार दि. २२ जानेवारी रोजी उचगांव (ता. बेळगाव) येथे श्री ज्ञानेश्वरी सांप्रदायिक एकदिवसीय पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत धर्मभूषण ह. भ. प. श्री एकनाथ शंकर सदगीर महाराज, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष कोकण प्रांत ठाणे, मुंबई यांचे सुश्राव्य कीर्तन निरूपण होणार आहे. सदर कार्यक्रम मठ गल्ली, गोजगा रोड, उचगांव ता. जि. बेळगांव येथे होणार असून सर्वांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments