बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव वाहतूक पोलिसांनी आज अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते खडेबाजारपर्यंतचे अतिक्रमण हटवून पुन्हा अतिक्रमण न करण्याचा  इशारा देण्यात आला.

बेळगाव शहरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. बेळगाव  तीन राज्यांना जोडणारा हा दुवा असून शहरात दररोज अनेक लोक येत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी बेळगाव वाहतूक पोलीस पुढे सरसावले. आज वाहतूक विभागाचे एसीपी जी.आर. निकम, सीपीआय श्रीकांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून खडेबाजार मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी फूटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना अतिक्रमण न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली.