बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठा मंदिराच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात येणार आहे. रविवार दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ .३० वाजता मराठा मंदिर च्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जेष्ठ कलाकार सौ. सायली जोशी - गोडबोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सौ. सायली जोशी या साहित्यिका असून त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर अनेक नाट्यप्रयोग सादर केले आहेत. याच बरोबर जाणता राजा, शिवपूत्र संभाजी, छावा सारख्या ऐतिहासिक नाटकातून नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार म्हणून त्याना सन्मानित करण्यात आले आहे. त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील "जिजाऊ" हा एकपात्री बहुरूपी नाट्यविष्कार सादर करणार आहेत. उपस्थिताना शिवकालात नेऊन मंत्रमुग्ध करतील. त्यासाठी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने अगत्यपूर्वक उपस्थित राहावे अशी विनंती मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव व सेक्रेटरी बाळासाहेब काकतकर यांनी केली आहे.
0 Comments