- बेळगावच्या बीम्स रुग्णालयातील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
प्रसूतीनंतर बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी बिम्स हॉस्पिटलच्या प्रसूती वॉर्डमध्ये घडली.
बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील अंजली पाटील (३१) असे मृत बाळंतिणीचे नाव आहे. प्रसूतीच्या त्रासामुळे काल संध्याकाळी तिला बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
दरम्यान अंजलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून बिम्सच्या आवारात कुटुंबीय आणि नातेवाईक जमले आहेत.
0 Comments