- दत्तकृष्णाई मंगल कार्यालय वडगांव येथे आयोजन
पुणे / परशराम निलजकर
खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेच्या माध्यमातून खानापूर, रामनगर, अळणावर, हलीयाळ व तत्सम परिसरातील पुणेस्थित महिलांना ; एकमेकांशी ओळख आणि स्नेहभाव वृद्धिंगत होणे, सामाजिक बांधिलकी जपणे, अंगभूत असलेल्या कलागुणांना वाव देणे, व्यक्तीमत्व विकास करवून घेणे आदी हेतूंसाठी खास महिलांचे स्वतंत्र पण मंडळाशी संलग्न व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
त्यातलाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी खास महिलांसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम दत्तकृष्णाई मंगल कार्यालय वडगांव या ठिकाणी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित तर राहवयाचे आहेच पण येणाऱ्या काळात आपल्या सर्व महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी संघटीत व्हावे ही नम्र विनंती, मंडळातर्फे करण्यात आली आहे.
0 Comments