बेळगाव / प्रतिनिधी

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव व एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन यांच्यातर्फे येत्या शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन बेळगाव - २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनात पुस्तक प्रकाशनासह शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल खानापूर येथील शिक्षिका माधुरी मनोहर कालकुंद्रीकर यांना 'राष्ट्रीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार' प्रदान करून गौरविले जाणार आहे. तरी शिक्षण व साहित्यप्रेमींसह नागरिकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.