अथणी / वार्ताहर
चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले अथणी तालुक्यातील यल्लम्मावाडी गावचे वकील व नेते सुभाष पाटणकर यांचा मृतदेह कृष्णा नदीत सापडला.
बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील कृष्णा नदी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी सकाळी ६ वा. सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी गुरुवारपासून सतत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.
मुलाच्या विवाहाच्या एक दिवस अगोदर बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह चार दिवसांनी सापडल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र पोलीस तपासानंतर या प्रकरणातील सत्य उलगडणार आहे.
0 Comments