- गत ६ वर्षांपासून पिकांसाठी नवभारत फर्टिलायझर्सच्या उत्पादनांचा वापर
कडोली / वार्ताहर
कृषीप्रधान बेळगाव तालुक्याच्या जाफरवाडी गावातील प्रगतशील शेतकरी महादेव कल्लाप्पा पाटील गेल्या सहा वर्षांपासून पुतण्या केतन पुंडलिक पाटील व मुलगा सुरज पाटील यांच्या मदतीने शेतात भरघोस पिके घेत आहेत. यासाठी ते नवभारत फर्टिलायझर्स या कंपनीची कीटकनाशके आणि खते या उत्पादनांचा वापर करत आहेत. याचा त्यांना पिकांसाठी चांगला उपयोग होत आहे. यंदाही त्यांनी फ्लॉवरचे दर्जेदार पीक घेतले आहे.
या अनुषंगाने नवभारत फर्टिलायझर्स कंपनीतर्फे मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी महादेव कल्लाप्पा पाटील व केतन पाटील यांचा जाफरवाडी गावातील त्यांच्या शेतामध्ये सत्कार करण्यात आला.
यानंतर कंपनीचे बेळगाव विभागाचे व्यवस्थापक भरमा सांबरेकर यांनी कंपनीच्या उत्पादनांबद्दल माहिती दिली. तसेच शेतकरी महादेव पाटील यांनी यंदा घेतलेले फ्लॉवरचे पीक दर्जेदार आहे. शेतात आलेल्या भरघोस पिकामुळे आमच्या उत्पादनाबाबत त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शेतकरी महादेव पाटील यांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना पुतण्या केतन पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना नवभारत फर्टिलायझर्स कंपनीची उत्पादने वापरण्याचे आवाहन केले.
यावेळी श्रीमती. माया पुंडलिक पाटील, अरुण जुई, गायत्री अरुण जुई, सुरज महादेव पाटील, रमेश खाचू अगसगेकर, अक्षय रमेश अगसगेकर यांच्यासह कंपनीचे कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
0 Comments