बेळगाव : येत्या सोमवारपासून सुरू होणारे कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशने आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून म. ए. समितीने आयोजिलेला महामेळावा लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पोलिसांनी सीमाभाग - महाराष्ट्र सीमेवर तपासणी नाके उभारले आहेत. महाराष्ट्रातील नेते? बेळगावला येण्याची शक्यता गृहित धरून कर्नाटक सरकारकडून ही खबरदार घेण्यात आली आहे. रविवारपासून या नाक्यांवर चोवीस तास पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.
शनिवारी दुपारी चेक पोस्ट शेड उभारण्यात आले. शनिवारी बंदोबस्त नव्हता; मात्र रविवारपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच? महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणार्या दुचाकींसह चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.
बेळगावात सीमावासीयांचा मेळावा होऊ न दिल्यास कर्नाटकच्या नेत्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नसल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिला आहे. त्यानंतर सीमेवरील दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे.? दरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश रोखण्यासाठी हालचाली गतिमान सुरू आहेत. यामुळेच बेळगाव तालुक्याच्या अतिवाड फाटा व बाची येथे ही चेक पोस्ट उभे करण्यात आले आहेत. त्याबरोबरच गोवा येथून येणार्या मार्गावरही कडक पहारा ठेवण्यात येणार आहे.
0 Comments