- शिवसेना ठाकरे गटाचे आवाहन
कोल्हापूर : कर्नाटक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. परंतु स्थानिक प्रशासन या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून सीमा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असते. मराठी भाषिकांवर जुलमी अत्याचार करत हा महामेळावा बंद पाडला. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली याची दखल घेत म. ए. समितीने आपला महामेळावा महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्र हद्दीत शिनोळी येथे आयोजित करून आपला निषेध नोंदवावा त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांना केले असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे नेते विजय देवणे यांनी दिली.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी येथे सीमा भागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचे आवाहन एका पत्राद्वारे शिवसेना नेते विजय देवणे यांनी महाराष्ट्र एकीकरण अध्यक्ष दीपक दळवी केले आहे. याबद्दल स्वतः व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून बोलताना विजय देवणे म्हणाले की, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे दरवर्षीप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा
महामेळावा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी रितसर परवानगी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली होती मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी महामेळाव्यास परवानगी नाकारली त्याचप्रमाणे 144 कलमानुसार जमावबंदीचा आदेश जाहीर केला होता.
याबद्दल स्वतः व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून बोलताना विजय देवणे म्हणाले की, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे दरवर्षीप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी रितसर परवानगी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली होती मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी महामेळाव्यास परवानगी नाकारली त्याचप्रमाणे 144 कलमानुसार जमावबंदीचा आदेश जाहीर केला होता त्याचप्रमाणे समिती नेते व कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती ही बाब लक्षात घेता कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांना विनंती केली आहे की, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी महामेळाव्यास जरी परवानगी दिली नसली तरी मराठी भाषिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्र हद्दीत शिनोळी येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करावा या मेळाव्याच्या आयोजनासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल तसेच या महामेळाव्याच्या माध्यमातून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविता येईल त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी यासाठी बेळगाव सीमाभागासंदर्भात काही ठराव देखील यावेळी मांडता येतील असे सांगून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन करावे असे लेखी पत्र दिले आहे, अशी माहिती शिवसेना नेते विजय देवणे यांनी दिली आहे.
0 Comments