बेळगाव / प्रतिनिधी
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगावात 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
बेळगाव येथे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी कार्यक्रम 27 डिसेंबर रोजी होणार होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी बेळगावात मुक्काम केला होता. तसेच दिनांक 27 रोजी काँग्रेस कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे तातडीने दिल्लीला परतले आहेत. अधिवेशनासाठी बेळगावात दाखल झालेले काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी माजी पंतप्रधानांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिल्लीत दाखल होणार आहेत.
- राहुल गांधी तातडीने दिल्लीला परतताना -
0 Comments