- लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्यातर्फे आयोजन
- डॉ. श्रीकृष्ण जोशी साधणार नागरिकांशी संवाद
बेळगाव / प्रतिनिधी
लोकमान्य हॉस्पिटल, पुणे यांच्यातर्फे बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ .३० वाजता आरोग्य संवाद….सांधे दुखीपासून मुक्त होण्याचा प्रवास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील वरेरकर नाट्यसंघाच्या सभागृहात सदर व्याख्यान होणार आहे. लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक, आंतरराष्ट्रीय किर्तीचे सांधेरोपणतज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या टीममधील डॉ. श्रीकृष्ण जोशी हे व्याख्यान देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
आजकाल बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार यामुळे तरुण वयातच सांध्याचे विकार, पाठदुखी सुरू होते. अशावेळी आपण दुर्लक्ष केल्याने वा योग्य वेळी उपचार न केल्याने हे आजार बळावतात. या आजारावर आपण वेळीच उपचार केले तर ९५% टक्के पाठदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरजच लागत नाही. मग आपण पाठ दुखी टाळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? ज्येष्ठ नागरिकाना भेडसावणारी समस्या म्हणजे सांध्याचे दुखणे त्यामध्ये
सांध्याचे आजार का उदभवतात ?ते या वयात टाळता येतात का ? कसे टाळायचे ?नियंत्रित कसे करायचे?, नेमके कोणते व्यायाम या वयात करायचे ?, काय खायचे?काहीना ऑपरेशन सांगितले जाते ते खरोखरीच गरजेचे असते का ?ऑपरेशन केलेच नाही तर काय होईल? इंजेक्शन,लेसर सारख्याचा उपयोग होतो का?या वयात ऑपरेशन सहन होते का? या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला डॉ.श्रीकृष्ण जोशी यांच्या व्याख्यानातून मिळणार आहेत. व्याख्यानाच्या नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे.
0 Comments