- जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन
- अमित शहा यांनी माफी मागावी निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधातील वक्तव्याचा होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीने निषेध नोंदवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे, अमित शहा यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गुडघे टेकून माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री पदावर असताना संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी शहा यांची आहे. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान आणि त्याद्वारे केलेले समतासंविधानाचे कार्य भाजप, आरएसएस आणि संघ परिवार विसरल्याचे या आंदोलनातून निदर्शनास आणले. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांनी माफी मागेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात जिल्हा संयोजक गुंडू तळवार, गिरेप्पा कोळकार, आनंद कांबळे, मारुती मोठे लक्कप्पगोळ, मल्लिकार्जुन कोळदूर, अंबिका चलवाडी, अनीता शिवराई, सावित्री मादार, द्राक्षायिणी कांबळे यांच्यासह इतर अनेक आंदोलक सहभागी झाले होते.
0 Comments