दिल्ली : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
झाकीर हुसैन यांच्यावर सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात उपचार सुरु होते, तसेच त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली होती. दरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचे वास्तव्य अमेरिकेतच होते. झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत कशी असते अगदी तसेच होते. वडील अल्लाह राखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबलावादनाचे धडे गिरवले होते. मात्र याच अत्यंत विनम्र कलावंताचे निधन झाले आहे. एका नामांकित दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
0 Comments