- राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ
बेळगाव / प्रतिनिधी
राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये मिळवलेल्या मूल्यांना नेहमीच प्रामाणिकपणे जोपासा. या डिजिटल युगात, शिक्षण कधीच थांबत नाही. तुमचे भविष्य आव्हानांनी भरलेले आहे. तेव्हा प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करून उज्ज्वल भविष्य घडवा असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी.सुधाकर यांनी केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ व्हीटीयूच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी उच्च अधिकारी आणि यू. एन.अन्न व कृषी संस्था मंगळूरचे डॉ. इड्या करूणासागर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रो.सी.एम.त्यागराज हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर पुढे म्हणाले, "विद्यार्थ्यांनी त्यांच्या आगामी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर कधीकधी जास्त गंभीरतेने विचार करत जगावे. जगात प्रत्येक गोष्ट एकमेकाशी संबंधित आहे. तुम्हाला ज्या प्रकारे आव्हानांचा सामना करायचा आहे त्यासाठी विविध दृष्टिकोनातून विचार करा. सद्भावनेने, मुक्त विचारांसह आणि सर्व स्तरातील लोकांशी सहयोग करून यश मिळवा, शिक्षणाची कास सोडू नका असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थांना केले.
कला, उद्योजकता, सामाजिक सेवा आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पं. एस. बालेश भजन्त्री यांना कला क्षेत्रातील, गोपाल जिनगौड यांना उद्योजकता आणि सामाजिक सेवेत, तसेच गोपाल होसुर यांना नागरिक क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. विविध विभागांतील पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
0 Comments