• केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची केली मागणी 

बेळगाव / प्रतिनिधी 

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात संसदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत एसडीपीआयने शुक्रवारी बेळगावात निदर्शने केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत एसडीपीआय संघटनेतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. अमित शहा यांनी तातडीने माफी मागावी. भाजप सुरुवातीपासून दलितांवर अत्याचार करत आला आहे. आतापर्यंत एकाही दलिताला मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही. वन नेशन, वन इलेक्शनची अंमलबजावणी करताना भाजपने दलितांचा अपमान करण्याचा उन्माद सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी एसडीपीआय संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.