- उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विद्यार्थी - विद्यार्थिनींचे घवघवीत यश
- शाळेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव खुल्या कराटे स्पर्धेत सतसंस्कार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील ओम मंगल कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सतसंस्कार इंटरनॅशनल स्कुलच्या ४० विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर "जनरल चॅम्पियनशिप" सह ४० पदके आणि ३० ट्रॉफी प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी - विद्यार्थिनींचे शाळेचे अध्यक्ष श्री. सिद्धारूढ संगोळी, मुख्याध्यापक ईरगौडा परसगौडा पाटील, शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळी नेण्यात आले तसेच संबंधित ठिकाणी परत सोडण्यात आले.
0 Comments