• पाठीमागून येणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने तब्बल चारवेळा उलटली कार   

बेळगाव : काकती - होनगा नजीक मागून येणाऱ्या वाहनाची कारला जोरात धडक बसल्याने कार तब्बल चारवेळा पलटी होऊन अपघात झाला. सदर घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. 

याबाबत प्राप्त  माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील होनगा - बेन्नाळी गावानजीक मागून येणाऱ्या वाहनाने हत्तरगीच्या दिशेने जाणाऱ्या कारला मागून धडक दिली.  ही धडक इतकी जोराची होती की, धडक बसताच कार तब्बल चारवेळा पलटी झाली. यामध्ये कारचालक यल्लाप्पा अप्पाण्णा चौगुले हे जखमी झाले. यासोबतच या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर काकती पोलीस स्थानकात अनेक वेळा तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप या घटनेची नोंद घेण्यात आली नसल्याची तक्रार कार चालकाने केली आहे.