चिक्कोडी / वार्ताहर 

चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावात दूधगंगा नदीच्या काठावर सुमारे १० फूट लांबीची मगर आढळून आली. ही मगर पाहून मलिकवाड गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय नदीकाठावरील शेतकरी शेतात जाण्यास टाळाटाळ करत आहेत.

कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या मलिकवाड दत्तवाड पुलावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये - जा सुरू असते. तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मगरींना जेरबंद करून सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.