बेळगाव / प्रतिनिधी 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप आणि जेडीएस नेते षडयंत्र रचत आहेत, केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर 10 वर्षात त्यांनी ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जनपर कार्य सहन होत नाही. याचा निषेध व्यक्त करीत आज दलित संघर्ष समिती बेळगाव शाखेच्या वतीने अर्धनग्न अवस्थेत तीव्र निदर्शने करून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

बेळगाव जिल्हा दलित संघर्ष समितीच्या वतीने, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप आणि जेडीएस षडयंत्र रचत असल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमधील चन्नम्मा सर्कलमध्ये, मनुवादी, केंद्र भाजप सरकार, पंतप्रधान मोदी, तसेच भाजप आणि जेडीएस नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन त्या ठिकाणी देखील घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना दलित संघर्ष समितीचे संजय तळवार यांनी म्हणाले, आज कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या वतीने, राज्यभर मोर्चा काढत आहोत . बहुमताने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि सरकारविरोधात सुरुवातीपासूनच भाजप आणि जेडीएस षडयंत्र रचत आहेत . हे बंद करावे असा इशारा यावेळी दिला.

तर संजय तळवलकर म्हणाले, विरोधी पक्षनेत्याना जराही मानमर्यादा नाही. बहुमताने आलेल्या सरकारला आणि दोन वेळा मुख्यमंत्री बनलेल्या सिद्धरामय्या यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जनपर कार्य त्यांना सहन होत नाही . ते वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. केंद्रातील भाजप सरकार तपास यंत्रणाच गैरवापर करीत आहे हे निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. 

यानंतरजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी दलित संघर्ष समितीचे बेळगाव जिल्हा शाखेचे डी सागर, मारुती, एन मनय्या, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.