बेळगाव / प्रतिनिधी 

गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल बेळगाव जिल्हा आयोजित सीबीएसई दक्षिण विभागीय व राष्ट्रीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन संघाने यश संपादन केले आहे.

गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल बेळगाव आयोजित सीबीएसई दक्षिण विभागीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुड शेफर्ड स्कूलचे विद्यार्थी सौरभ साळोखे व अनघा जोशी यांचा पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, इम्रान बेपारी आदींचा सहभाग होता.