- बेळगाव ऑटो चालक - मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
कॅंटोन्मेंट हद्दीतील गणेशपूर रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी चौक, वनिता विद्यालय, गणेशपूर बस स्थानक या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी बेळगाव शुल्क कॅंटोन्मेंट बोर्डाने शुल्क आकारणी सुरू केली आहे. प्रत्येक वाहनासाठी २० ते ३० रुपये शुल्क वसूल केले जात आहे. रिक्षा चालकांना भाड्याच्या रकमेतील निम्मी रक्कम पार्किंग शुल्क म्हणून भरावी लागत आहे. परिणामी रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे त्वरित शुल्क आकारणारी धोरण रद्द करण्याची मागणी करत बेळगावातील रिक्षाचालकांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
यावेळी ऑटोचालक बसवराज आवरोळी म्हणाले, अलीकडे व्यसनाधीन व्यक्तींकडून नशेत ऑटोचालकांवर हल्ले होत आहेत. शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. मोफत बससेवेमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनी पार्किंग शुल्क रद्द करून ऑटोचालकांचे हित पाहावे,असे त्यांनी सांगितले.
याआधी दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने एका ऑटोचालकाला मारहाण केली होती. शहर व्यसनमुक्त करण्याची आमची मागणी असल्याचे अन्य एका ऑटोचालकाने सांगितले. यावेळी बेळगाव ऑटो चालक आणि मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
0 Comments