बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यावतीने नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी नंदादीप रुग्णालय परिसर टिळकवाडी बेळगाव येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. 

प्रारंभी आनंद तुप्पड, पीआरओ नंदादीप हॉस्पिटल यांनी रोटरी सदस्यांचे स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा आरटीएन डॉ. रुपाली जनाज यांनी स्वागत केले. यावेळी डॉ.जोत्स्ना पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना, नियमित नेत्रतपासणी प्रत्येकासाठी का महत्त्वाची आहे आणि डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरटीएन कावेरी करूर यांनी केले आणि कार्यक्रम अतिशय सुरळीतपणे हाताळला. यावेळी डॉ. श्रुती रेवणकर, प्रशासक इरय्या मास्तमर्डी, संचालन व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, पीआरओ आनंद तुप्पुड, आरसीबी दर्पण सचिव आरटीएन शीतल चिलामी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरटीएन राजश्री उप्पीन आणि आरसीबी दर्पणचे सर्व सदस्य उपस्थित होते.