- मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस तपास सुरू
- पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांची प्रसारमाध्यमांना माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या सांबरा विमानतळाच्या कंपाऊंडनजीक सोमवारी सकाळी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
मारिहाळ पोलीस स्थानकांतर्गत होन्निहाळ आणि माविनकट्टी गावाजवळील बेळगाव विमानतळ कंपाऊंडजवळील शेतात सदर तरूणाचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या खिशात दुचाकीची चावी सापडली, अद्याप तरुणाची ओळख पटलेली नाही. मात्र डोक्यात दगड घालून खून झाल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह पाहून शेतकरी हैराण झाले आणि त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मारिहाळ पोलीस स्थानक व शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेनंतर होन्निहाळ आणि माविनकट्टी मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखली.ज्याठिकाणी खून झाला त्या ठिकाणची पोलिसांनी पाहणी केली आहे. खुनाच्या घटनास्थळाजवळ एखादे वाहन आहे का, याचा तपास सुरू आहे.
0 Comments