बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचा झपाट्याने वाढता विस्तार पाहता बेळगावच्या रहदारीमध्येही वाढ झाल्र्याने अनेक ठिकाणी फ्लायओव्हर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या ताशिलदार गल्ली, महाद्वार रोड, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर देखील रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तानाजी गल्ली येथे असणाऱ्या रेल्वेगेटनजीक रेल्वेउड्डाणपूल बांधण्यासाठी प्रस्ताव मांडून याबाबत तयारीही सुरु होती. मात्र स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेत प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्यात येणार आहे.
बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन खासदार जगदीश शेट्टर आणि विविध खात्याचे अधिकारी यांच्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीत या फ्लाय ओवर बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये स्थानिक नागरिक बाळान्ना कगगनगी , राहुल मुचंडी नगरसेवक भागवत, राजू भातकांडे, इंद्रजीत पाटील आदी उपस्थित होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याने याविरोधात नागरिकांनी आवाज उठविला होता. प्रसारमाध्यमांनी येथील नागरिकांची बाजू उचलून धरत नागरिकांचे म्हणणे मांडले होते. अखेर प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा करून बैठक बोलावून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. बेळगाव महापालिकेतील ठराव आणि खासदारांचे शिफारस पत्र वरिष्ठांना पाठवून देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणच्या प्रस्तावित फ्लाय ओव्हर होणार नाही याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
0 Comments