बेळगाव / प्रतिनिधी 

दुचाकी चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. हेमंत शिवाजी जंगले (रा. गँगवाडी, ज्योतीनगर ;बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडुन चोरीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

बेळगाव शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन, पोलिस उपायुक्त कायदा व सुव्यवस्था बेळगाव शहर, पोलिस उपायुक्त गुन्हे व वाहतूक बेळगाव शहर व सहाय्यक पोलीस आयुक्त मार्केट उपविभाग बेळगाव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली. 

केएलई हॉस्पिटल रोडवर संशयास्पदरित्या फिरत असताना हेमंत शिवाजी जंगले याची चौकशी केली असता, त्याने शहरातील विविध ठिकाणाहून एकूण ८ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. एपीएमसी पोलिस स्थानक आणि संकेश्वर पोलिस स्थनाकच्या हद्दीतील प्रत्येकी एक दुचाकी सापडली असून उर्वरित ६ दुचाकी मालकांचा शोध सुरू आहे. सदर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक आर.आर.पाटील (प्रभारी), पीएसआय मंजुनाथ भजंत्री, त्रिवेणी नाटीकर, बी. के. मिटगार, एएसआय, व कर्मचारी सदस्य .बी.एम. नरगुंद, एफ.बी. मुजावर, खदार खानम्मवर, गोविंदा पुजारी आणि. एन. डी. बिरगोंडा यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.