- तिसऱ्या दिवशी बेळगावात हजारोंच्या संख्येने नागरिक दौडमध्ये सहभागी
बेळगाव / प्रतिनिधी
तरुणांमध्ये देशप्रेम जागविण्यासाठी दुर्गामाता दौडला तिसऱ्या दिवशीही शनिवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.'जय भवानी जय शिवाजी, हरहर महादेवचा जयघोष' करीत हजारो तरुण- तरुणी व बालक सहभागी झाले होते. तिसऱ्या दिवशीच्या दौडला राणी चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरातून प्रारंभ झाला. तत्पूर्वी ध्वज चढविण्यात आला. यानंतर आरती व प्रेरणा मंत्र म्हणून दौडला चालना देण्यात आली. दरम्यान शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी दौडचे स्वागत केले.
यावेळी विशेष करून युवतींसह दिव्यांगांच्या उपस्थितीने दौडचे महत्व आणि प्रेरणा अधोरेखित केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्रोत्सवात दररोज पहाटे निघणाऱ्या श्री दुर्गामाता दौडमुळे शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरातून सुरू झालेली दौड पुढे काकतीवेस, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली पासून प्रारंभ होऊन पी. बी. रोड आरटीओ सर्कल, छत्रपती शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगर मार्गे, किल्ला श्री दुर्गा देवी मंदिरामध्ये दौडची सांगता करण्यात आली.
तिसऱ्या दिवशी राणी चन्नम्मा सर्कल येथून काढलेल्या दौडचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. शिवरायांच्या अखंड गजराने रिसर दुमदुमून गेला होता. दौड मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून ध्वजाचे पूजन केले. यावेळी भगवे फेटे, भगव्या पताका, भगवे झेंडे यामुळे वातावरणही भगवेमय झाले होते. तसेच पांढऱ्या टोप्या, पांढरे वस्त्र आणि धारकऱ्यांच्या उत्साहामुळे दौडमध्ये चैतन्य निर्माण होत आहे. किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात ध्वज उतरवून तिसऱ्या दिवशीच्या दौडची सांगता झाली.
यावेळी उपस्थित दिव्यांगांमधील अनिल गोपाळ भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना, दुर्गामाता दौड ही केवळ एक शर्यत नाही, तर नवचैतन्य प्रकाशित करणारी शक्ती आहे. हिंदू धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ८० वर्षांच्या व्यक्तीचाही उत्साह द्विगुणीत करते. यात केवळ तरुण-तरुणीच नव्हे तर दिव्यांगांचे सहभाग होता हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्याय एका युवतीने मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व दौडचे स्पष्ट केले.
- दौडचा उद्याचा मार्ग :
रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी नाथ पै सर्कल येथील अंबाबाई मंदिरापासून दौडला प्रारंभ होणार आहे. लक्ष्मी रोड, कारवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरी नगर, मारुती गल्ली बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, आचार्य गल्ली,गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण्णा गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठल देव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमाळ बोळ, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मीरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, एम.एफ.रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी वडगाव रोड, अळवाण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे सांगता होणार आहे.
0 Comments